सत्यरंजन साठे - लेख सूची

समान नागरी कायदा

सर्वोच्च न्यायालयाने सरला मुद्गल खटल्यात, एका हिंदू पुरुषाने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला व त्यानंतर दुसरा विवाह केला. या तक्रारीच्या संदर्भात हे असे न व्हावे म्हणून शासनाने सर्व जमातींना समान असा विवाहविषयक कायदा करावा अशी सूचना दिली. राज्यघटनेच्या 44 व्या कलमात शासनाने समान नागरी कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे. त्याचा आधार …

हिंदूंचे हित कशात आहे?

आपल्या देशात गेल्या तीन दशकांत अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध हत्याकांड सातत्याने होत आहे. ७० च्या दशकात भिवंडीला, ८० च्या दशकात दिल्लीला, ९० च्या दशकात मुंबईला आणि २००० च्या दशकात गुजराथमध्ये. प्रत्येक नियोजित हत्याकांडात पूर्वीच्या दशकातल्या हत्याकांडापेक्षा जास्त अमानुषता आणि संघटित क्रौर्य झाले. गुजरातमधल्या हत्याकांडात हिडीसपणा, बीभत्सपणा यांचा उच्चांक झाला. त्यातल्या अमानुषतेच्या कहाण्या नाझी अत्याचारांनाही लाजवणाऱ्या आहेत. …

संघाचा फतवा : राज्यघटनेलाच आव्हान

गुजरातमध्ये ज्यांनी अमानुष कृत्ये केली ते हिंदू नव्हते; तर माणसाच्या रूपातील राक्षस होते. मला जे हिंदुत्व भावते ते “दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांच्छील तो तें लाहो, प्राणिजात” असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचे. कारण ते हिंदुत्व वैश्विक आहे, मानवतावादी आहे. जे हिंदुत्वाचा उपयोग माणसामाणसांतील द्वेष आणि भीती वाढवण्याकरता करतात, ते हिंदुत्ववादी नाहीतच. ज्ञानेश्वर, तुकाराम, …

समान नागरी कायदा

सर्वोच्च न्यायालयाने सरला मुद्गल खटल्यात, एका हिंदूपुरुषाने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला व त्यानंतर दुसरा विवाह केला या तक्रारीच्या संदर्भात हे असे न व्हावे म्हणून शासनाने सर्व जमातींना समान असा विवाहविषयक कायदा करावा अशी सूचना दिली. राज्यघटनेच्या ४४ व्या कलमात शासनाने समान नागरी कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे. त्याचा आधार घेऊन …

धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय विशेषांक

संपादकीय : अभ्यागत संपादकांचे निवडणुकीच्या प्रचारात “हिंदुत्व’ हा मुद्दा घेऊन प्रचार केल्यास निवडणूक कायद्यातील १२३ व्या कलमातील उपकलम (३) मध्ये वर्णिलेल्या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब होत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रमेश प्रभू वि. प्रभाकर काशीनाथ कुंटे [(१९९६), १ सुप्रीम कोर्ट केसेस, पान १३०] या खटल्यात दिला. या निर्णयाचा फायदा श्री. मनोहर जोशी व प्रा. राम …

धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय

‘सेक्युलरिझम’ या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोणता?प्रा. अ. भि. शहा यांनी ‘इहवाद’ असा शब्द पर्यायी म्हणून वापरला. इहवादी असणे म्हणजे या जीवनातील बाबतीत विचार आणि आचार ठरवताना कुठल्याही पारलौकिकाचा विचार न करणे, माणसाच्या आचारविचारांना फक्त माणसा-माणसांतील व्यवहारांबाबतच्या नीतिनियमांचा संदर्भ असणे, हे नीतिनियम माणसाचे कल्याण कशाने होईल याचा विचार करूनच ठरवलेले असणे. अशा नीतिनियमांना अर्थातच धर्म, …